चहा मसाला रेसिपी मराठी | chaha masala recipe in marathi

चहा मसाला रेसिपी  मराठी | chaha masala recipe in marathi

नमस्कार सर्व खवय्यांना इन मराठी रेसिपी डॉट इन या मराठी ब्लॉगवर आपले स्वागत आहे आजच्या या पोस्टमध्ये chaha masala recipe in marathi  चहाचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहे. चहाचा मसाला अत्यंत कमी व घरामध्ये असलेल्या साहित्यामधून बनवता येतो

चहा म्हणलं की मराठी माणसाचा आवडता पेय पदार्थ. महाराष्ट्रात तसेच भारतभर मोठ्या संख्येने चहा प्रेमी हजारोच्या संख्येने आहे.त्यात मराठी माणसाला चहा शिवाय करमतच नाही त्याला चहाची त्यालाच तलब लागली असते. सकाळी उठल्याबरोबर दुपारी, ऑफिस मध्ये, याव्यतिरिक्त कामावर असताना दिवसातून तीन कप हवाच असतो.

म्हणूनच आम्ही आजच्या लेखात चहाला आणखी एक वेगळी चव देण्याकरिता चहाचा मसाला रेसिपी घेऊन आलो आहे.

चहाचा मसाला बनवायची साठी खूप कमी वेळ लागतो आणि तो  मसाला आपण वर्षभर सुद्धा साठवून ठेवू शकतो.

चहाचा मसाला वर्षभर टिकण्यासाठी लेखाच्या शेवटी एक टीप दिलेली आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. आणि सोबतच्या चहाच्या मसाल्याचे प्रमाण किती घ्यायचे हेसुद्धा सांगण्यात आले आहे.

तरी तुम्ही हा लेख नक्की शेवटी पर्यंत वाचा. तर चला मग बघुया चहाची मसाला रेसिपी मराठी.chaha masala recipe in marathi 

चहा मसाला रेसिपी  मराठी | chaha masala recipe in marathi

चहाचा मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य.

  1. तीन मोठ्या मोठ्या आकाराचे सुंठ.
  2. एक चमचा लवंगा
  3. एक लहान जायफळ किंवा मोठा असेल तर जायफळ.
  4. हिरवी वेलची म्हणजेच विलायची तीन चमचे.
  5. अर्धा चमचा काळी मिरी.
  6. एक ते दोन दालचिनीचे तुकडे.
  7. एक तुकडा जेष्ठ मध

चहाचा मसाला बनवण्याची कृती

सर्वात प्रथम तीन मोठ्या मोठ्या आकाराचे सुंठ. एका खलबत्त्यामध्ये थोडे बारीक करून घ्या. जेणेकरून मिक्सरमधे फिरवताना अडचण जाणार नाही.

आता ज्याप्रमाणे बारीक केले त्याचप्रमाणे जायफळ सुद्धा बारीक करून घ्या. यानंतर मिक्सरची एक भांड घ्या.

रव्याचा उपमा रेसिपी मराठी

त्यामध्ये हिरवी वेलची म्हणजेच विलायची तीन चमचे.अर्धा चमचा काळी मिरी.एक ते दोन दालचिनीचे तुकडे. व हवे असल्यास एक तुकडा जेष्ठ मध चा घालू शकता.

आता मिक्सर हे साधारणतः शक्य तितके पावडर होत पर्यंत बारीक करून घ्यावे.

तयार आहे तुमचा चहाचा मसाला पावडर.हा मसाला पावडर तुम्ही आपल्या त्याच्यामध्ये वापरू शकता.

टिपः चहाचा मसाला दीर्घकाळ टिकण्यासाठी तो एका हवाबंद डब्यात भरून ठेवावे. तसेच क्या डब्यामध्ये चहाचा मसाला भरतांना डब्बा दोन उन्हामध्ये वाळवून घ्यावे किंवा फडक्याच्या मदतीने पूर्ण कोरडे करून घ्यावे.

टिपः दोन कप चहा साठी साधारणता एक लहान चमचा चहाचा मसाला पावडर तुम्ही टाकू शकता.

तर ही होती चहाचा मसाला पावडर रेसिपी इन मराठी. चहाचा मसाला बनवायला तेवढा सोपा आहे तेवढाच आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. तुम्ही चहाचा मसाला घरी बनवून बघा आणि यापासून चहा बनवून खाली कमेंट मध्ये नक्की कळवा की चहा कसा झाला.

चहाचा मसाला रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी परिवारा बरोबर नक्की शेअर करा आणि विविध रेसिपी साठी इन मराठी रेसिपी या डॉट in ला भेट देत रहा.

Post a Comment

0 Comments