चाकवतची भाजी रेसिपी मराठी | chakvat bhaji recipe in marathi | chakvat bhaji

चाकवतची भाजी रेसिपी मराठी | chakvat bhaji recipe in marathi | chakvat bhaji

chakvat chi bhaji recipe in marathi : नमस्कार in मराठी रेसिपी मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चाकवताची भाजी chakvat bhaji मराठी रेसिपी.


म्हणजेच चाकवताची भाजी कशी करायची हे आज आपण बघणार आहोत.चाकवताची भाजी ही एक पालेभाजी आहे. चाकवत या भाजीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

काही भागांमध्ये याला गार गट्टा, या नावाने ओळखले जाते तर काही भागांमध्ये या बातूअा या नावाने सुद्धा ओळखले जाते.चाकवताची भाजी chakvat bhaji बहुगुणी भाजी आहे.

ही भाजी आपल्या शरीरासाठी आरोग्यसाठी अतिशय उत्तम भाजी आहे या भाजीचे विविध फायदे फायदे लेखाच्या शेवटी सांगितलेले आहे तर चला मग सुरू करूयात चाकवत ची भाजी कशी करायची. चाकवत भाजी रेसिपी मराठीमध्ये


चाकवत भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रकारे.

  1. एक पूर्ण जूडी चाकवत ची भाजी.
  2. दोन मोठे चमचे शेंगदाणे
  3. हरभऱ्याची डाळ दोन मोठे चमचे.
  4. लसणाच्या पाकळ्या दहा ते पंधरा
  5. हिरव्या मिरच्या तीन ते चार.
  6. बेसन एक मोठा चमचा
  7. बारीक चिरलेला एक टोमॅटो
  8. जिर
  9. तेल
  10. चवीप्रमाणे मीठ

चाकवतची भाजी कशी करायची.चाकवतची भाजी तयार करण्याची कृती.

सर्वात प्रथम चाकवताची भाजी  निवडून घ्यावी.
त्यानंतर चाकवताची भाजी स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी.
एका मध्ये हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुऊन घ्यावी.
 त्यानंतर चाकवताची भाजी मध्ये ती हरभऱ्याची डाळ बारीक चिरलेला टोमॅटो शेंगदाणे घालून घ्यावे.
अनिता मध्येच येत पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालूनसर्व एकत्र मिक्स करून घ्यावे.
आता हे मिश्रण कुकरच्या भांड्यात ठेवून. 3 ते 4 शिट्ट्या होत पर्यंत शिजवून घ्यावे.
कुकरच्या शिट्ट्या होत पर्यंत एका बाजूला हिरव्या तीन हिरव्या मिरच्या लसन आणि जिर यांची पेस्ट करून घ्यावी.
4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर मधील भाजी बाहेर काढून घ्यावी.
आता त्यामध्ये बेसन घालून सर्व पैकी मिक्स करून घ्यावे. भाजीला व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर भाजीला दाटपणा येतो.


चाकवतची भाजीची chakvat bhaji फोडणी.


चाकवतची भाजी ची फोडणीसाठी लागणारे साहित्य.

  • तेल दोन मोठ चमचे
  • मोहरी
  • हिंग 
  • हळद

लुसलुशीत मोदक रेसिपी मराठीमध्ये | modak recipe in Marathi

भाजीला फोडणी देण्याकरिता एक लोखंडी कढई गॅसवर ठेवावी. त्यानंतर त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून गरम करून घ्यावे.
त्या मध्ये मोहरी घालून शिजू द्यावी. मोहरी मस्त पैकी तडतडू द्यावी.
मोहित तडतडूल्यानंतर त्या मध्ये आपण आधी केलेली हिरव्या मिरचीचा पेस्ट घालावी.
हिरव्या मिरचीची पेस्ट घातल्यानंतर ते व्यवस्थितपणे परतून घ्यावे.
आता त्या मध्ये हिंग,हळद घातल्यानंतर, लगेचच मगाशी शिजवली चाकवतची भाजी त्यामध्ये घालावी.
आता सर्व मिश्रण एकदा मिक्स करून घ्यावे सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालावे.

टिपः या अगोदरही आपण मिठ घातले होते म्हणून थोडे कमी मीठ घालावे.

जर तुम्हाला गडद भाजी हवी असेल तर त्याबद्दल तुम्ही पाणी  तुमच्या आवश्यकतेनुसार टाकू शकता.
आता साधारणता भाजीला तीन ते चार मिनिटे उकळी आणा त ठेवावी.

चार ते पाच मिनिटात झाल्यानंतर भाजी गॅस बंद करावे.
तयार आहे तुमची चाकवताची भाजी.आता एकच सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून मध्ये काढून ही माझी तुम्ही ही भाजी सर्व करू शकता.

ही भाजी तुम्हाला चपाती सोबत किंवा भातासोबत आणि विशेष म्हणजे भाकरी सोबत अतिशय छान लागते.

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा. तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा.आणि ही रेसिपी कशी झाली ही सांगण्याकरिता का बनवले नक्की सांगा.


चाकवताची भाजी रेसिपी आपल्या मित्रपरिवाराला बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा बद्दल माहिती  होईल.
नवनवीन रेसिपी बघण्यासाठी इन मराठी रेसिपी या ब्लॉगला भेट देत राहा.

Post a Comment

0 Comments